रावेरला श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

रावेर :- भारतीय बौद्ध महासभा जळगाव (पूर्व) यांचे अंतर्गत तसेच रावेर तालुका शाखा व शहर शाखेच्या माध्यमातून रावेर शहरातील बुद्धनगरी, स्टेशन रोड, रावेर येथील सामाजिक सभागृह येथे येणाऱ्या १७ मे २०२४ ते २६ मे २०२४ या कालावधीत १० दिवसीय श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिविराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर श्रामणेर शिबिराचे उद्घाटन दिनांक : १७ मे २०२४ रोजी ठिक १२.०० वाजता पुज्य भंतेजी दिपंकर महाथेरो चैत्यभूमी दादर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षक प्रकाश सरदार हे आहेत.तर जिल्हा कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन वसंत लोखंडे, महिला जिल्हा संघटक आशा पोहेकर, प्रज्ञा वाघ, प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भारतीय बौध्द महासभा जळगाव (पू) जिल्हा शाखा, सर्व तालुका शाखा पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक/शिक्षिका, बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, समता सैनिक दल सर्व सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन

रावेर तालुका व शहर शहर शाखा

भारतीय बौद्ध महासभा यानी केले आहे. शिबिर यशस्वीतेसाठी रावेर तालुका अध्यक्ष राजेंद्र अटकले, सचिव संघरत्न दामोदर, गौतम अटकाळे, विजय भोसले, जिल्हा संघटक विजय अवसरमल, शहर अध्यक्ष राहुल गाढे, महेंद्र वानखेडे, संतोष तायडे, महेन्द्र तायडे, रितेश निकम, ज्ञानेश्वर गाढे इत्यादींनी परिश्रम घेतले .

ताजा खबरें