रावेर ग्रामीण पत्रकार संरक्षण समिती चा सन्मान सोहळा निंभोरा येथे संपन्न

रावेर प्रतिनिधी– राजेंद्र महाले                            रावेर -:तालुक्यातील निंभोरा येथील कृषी विद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पत्रकार संरक्षण समिती चा सन्मान सोहळा संपन्न झाला

रावेर तालुका ग्रामीण पत्रकार संरक्षण समिती कार्यकारिणी जाहिर करण्यात येऊन सर्व कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निंभोरा येथील कृषि तंत्र विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद भाऊ बोंडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे हे होते या सन्मान सोहळा कार्यक्रमात सर्व पत्रकारांना ट्राफी, नियुक्ती पत्र सन्मानित करण्यात आले .यावेळी पत्रकार समितीचे ग्रामीण तालुका अध्यक्ष प्रदिप पंजाबी महाराज यांनी समितीचे ध्येय व धोरणे हे पटवून सांगितले व पत्रकारांच्या भविष्यासाठी काय उपाययोजना करता येतील या बाबतीत माहीती दिली तसेच प्रल्हादभाऊ बोंडे , जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे, अनिल आसेकर,अँड .शिवदास कोचुरे ,काशीनाथ शेलोडे यांनी मनोगत व्यक्त केले .,या सन्मान सोहळ्याला जेष्ठ नागरिक संघाचे प्रल्हाद कोचुरे ,तालुका उपाध्यक्ष सुमित पाटील, युसुफ शहा, भिमराव कोचुरे ,यासह पदाधिकारी उपस्थित होते प्रास्ताविक सूत्रसंचालन युवराज कुरकुरे यांनी केले आभार विजय अवसरमल यांनी मानले.