राष्ट्रवादीच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटेच का दिसतात?

तुम्ही कधी विचार केला आहे का की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटे का दिसतात?

एका मुलाखतीमध्ये रोहित पवारांना हा प्रश्न करण्यात आला होता. रोहित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटे का दिसतात? असा प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नावर रोहित पवारांनी सुरुवातीला मिश्किलपणे उत्तर दिलं होतं. “राष्ट्रवादीच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटे दिसतात तेव्हा बरोबरचं चिन्ह दिसतं,” असं ते हसत म्हणाले. नंतर यामागील कारण स्पष्ट करत म्हणाले “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १० वाजून १० मिनिटांनी झाली होती. म्हणून पक्षाच्या चिन्हाच्या घडाळ्यात नेहमी १० वाजून १० मिनिटे दिसतात. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ साली शरद पवार यांनी केली होती.

jalgaonsandesh

jalgaonsandesh