रिक्षात प्रवासी बसवुन प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड,स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची कारवाई.

जळगाव -:गेल्या महिन्या भरापासून जळगाव जिल्ह्यात रिक्षात प्रवाशांना बसवून हातचालकीने त्यांचे पैसे चोरून थोडे अंतरावर जावून त्यांना उतरवून पसार होणारी अज्ञात चोरटयांची टोळी धुम करीत होती. त्यावेळी मा. पोलीस अधीक्षक डॉ. श्री प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तपासा बाबत आदेश दिले. त्यावरून मा. किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी त्यांचे स्वतंत्र पथक तयार करुन त्यात पो.ह जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बावीस्कर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र पवार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांची पथक नेमण्यात आले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरात फिरुन गुप्तबातमीदारा मार्फत माहिती काढत असतांना मा. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, यावल पो.स्टे. गु.र.नं. ३३१/२०२२ भादंवि क.३७९,३४ या गुन्ह्यात फिर्यादी सोबत रिक्षात बसून फिर्यादीचे पैसे हातचालाकीने काढले आहेत. सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार मोसीन उर्फ शेमडया पठाण व त्याचे इतर साथीदार यांनी चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याचा शोध घेत असतांना १) मोसीन खान उर्फ शेमडया नुरखान पठाण, वय २८, रा. पिंप्राळा हुडको जळगाव, २) अरशद शेख हमीद शेख, वय २३, रा. सुरेशदादा नगर, गेंदालाल मिल जळगाव ३) शेख फिरोज शेख करीम, वय ३०, रा. गेंदालाल मिल बिल्डींग नं. २८, रुम नं.२५ जळगाव, ४) मनोज विजय अहिरे, वय ३१, रा. गेंदालाल मिल बिल्डींग नं. २१ रुम नं. ४० जळगाव हे गुन्ह्यांत वापरलेल्या रिक्षासह डि मार्ट जवळ मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून विश्वासात घेवून विचारपुस केली असता सदर आरोपीतांनी पारोळा पो.स्टे. येथील गुन्ह्यांची कबुली दिली असून दोन्ही गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व गुन्हयांतील माल असे एकूण १,०९,३००/- रु. कि.चा मद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh