तळोदा -:राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण अशा विषयांवरती सतत त्याने काम केले होते. त्याचाच एक भाग म्हणून सेवाभावे प्रतिष्ठान, तळोदा तर्फे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त तलावडी गावात परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शालेय समिती सौ.संध्याताई विलास ठाकरे होते. या कार्यक्रमाला सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे हे होते.

या कार्यक्रमासाठी तलावडी जिल्हा परिषद मुख्याध्यापक श्री. दिलीप दातक्या वसावे सेवाभावे प्रतिष्ठानाचे श्री.सतीश भाई सोलंकी जिल्हा परिषद शालेय समितीचे उपाध्यक्ष श्री.सुनील नेहरू पाडवी,सौ.लिलाबाई सुरेश पाडवी, सौ.ताराबाई ठाकरे,सौ.निंबाबाई ठाकरे,श्री.नेहरू दादा पाडवी हे होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सेवाभावे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष जगत चौधरी ,उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव कविता दिलीप कलाल,संचालक नकुल दित्या ठाकरे,श्री.अतुल भिमसिंग पाटील,श्री.अनिल भामु नाईक,चि.पवन सोनवणे, चि.रोहन गुरव यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे आभार तलावडी गावाचे जिल्हा परिषद मुख्याध्यापक श्री. दिलीप दातक्या वसावे सर यांनी केले.