चोपडा (प्रतिनिधी):-तालुक्यात बागायती व खरिपाच्या पिकांना खतांच्या मात्रा देण्याचे काम जोरावर सुरू आहे. महागड्या विषारी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. यापासून मुक्तता मिळविण्यासाठी पिकांना ऑरगॅनिक सेंद्रिय जैविक खते देऊन उत्पन्नात वाढ करण्यासाठी वेलसन फार्मर फर्टीलायझर कंपनीची दाणेदार, पावडर व विद्राव्य खते वापराकडे शेतकऱ्यांचा जास्त कल दिसत आहे.यासाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर, वेलसनचे प्रचारक सुरेश पटेल शहादा, राजाराम पाटील धुळे हे ऑरगॅनिक खतांबाबत जनजागृती व मार्गदर्शन करीत आहेत.शेतकर्यांच्या मागणीनुसार वेलसनची खते घरपोच पुरविण्यात येत आहेत.यावेळी सेंद्रिय शेती व खतांना प्राधान्य देणार्या शेतकर्यांचा सत्कारही करण्यात येत आहे.
विषमुक्त शेती व रोगमुक्त भारत बनवण्यासाठीचा शुभ संकल्प..
शेतकरी बांधवांनी महागड्या विषारी रासायनिक खतांऐवजी अल्पदरात अमृततुल्य वेलसनची ऑरगॅनिक खते वापरून आपल्या शेतीची उत्पादकता व उत्पन्नही वाढवावे. यासाठी शेतकऱ्यांना (कॅश ऑन डिलिव्हरी) खते पुरवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी “विषमुक्त शेती व रोगमुक्त भारत” बनवण्यासाठी ऑरगॅनिक खतांच्या वापराबाबत शुभसंकल्प करणे गरजेचे आहे..
जगन्नाथ बाविस्कर माजी संचालक..मार्केट कमेटी चोपडा.
……………………………………………