भामलवाडी येथील पत्रकार विनोद कोळी यांचेवर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेध

रावेर – : तालुक्यातील भामलवाडी येथील पत्रकार विनोद कोळी हे बातमी वृत्त संकलनासाठी चित्रीकरण करत असताना येथीलच काही उपद्रवींनी पत्रकार विनोद कोळी आणि त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले यांना जबर मारहाण केली व त्यांच्यावर जीव घेणा हल्ला करून त्यांना दुखापत केली. मात्र संबंधित पोलीस अधिकारी यांनी कोणतीही तक्रार न घेता उलट विनोद कोळी यांना तुम्ही पत्रकार आहात याचा पुरावा द्या ? आणि पुरावा दिल्यानंतर तुम्ही पत्रकार आहात पण आधी स्वीकृती पत्रकात आहात का? तरच मी तुमची तक्रार घेईल. अशा पध्दतीने संबधीत मारहाण करणाऱ्यांची बाजू सांभाळली. या विषयी रावेर तालुका पत्रकार संरक्षण समिती शहरी व ग्रामीण दोन्ही समित्या मिळून यांची सावदा येथील विश्रामगृहावर दिनांक 15 जुलै रोजी दुपारी तीन वाजता महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली यामध्ये ग्रामीण आणि शहरी दोघे मिळून मोठ्या प्रमाणात पत्रकारांची उपस्थिती होती पत्रकारांवर वारंवार होत असलेले भ्याड हल्ले त्वरित थांबवावे व हल्ले करणाऱ्यांनवर त्वरित कारवाई करावी यासाठी पत्रकार बांधव आता शांत राहणार नाहीत व संबंधितांना शिक्षा झालीच पाहिजे यासाठी संबंधित अधिकाऱ्याने याबाबत ठोस पाऊल न उचलल्यास सोमवार रोजी शहर आणि ग्रामीण पत्रकार संरक्षण समिती चे पदाधिकाऱ्यांचे वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याबाबत निवेदन देऊन तक्रार करण्यात येणार आहेत.

यावेळी रावेर तालुका पत्रकार संरक्षण समिती अध्यक्ष राजू उर्फ मुबारक तडवी ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रदीप जी महाराज ज्येष्ठ पत्रकार राजूभाऊ बोरसे,युसुफ शाह,फरीद शेख,राजेश पाटील,दिलीप चांदेलकर, भीमराव कोचुरे,राजेंद्र महाले, राज चौधरी,विनोद कोळी,अनिल इंगळे,संजय पाटील,योगेंद्र भालेराव, मोहसीन शाह इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

ताजा खबरें