सोलापुर – रविवारदिनांक 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर मधील वाखरी येथील (पालखी विसावा ठिकाणी) श्रीकृष्ण मंगल कार्यालयामध्ये सोलापूर जिल्हा बँड बँजो चालक कलाकारांच्या जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकारी नियुक्ती प्रसंगी झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षपदावरून प्रा. अशोकराव जाधव यांनी चालक व कलाकारांच्या समस्या मुख्यमंत्री महोदया पुढे मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार.
प्रदेश सरचिटणीस सुभाषराव आडागळे, प्रदेश सदस्य दत्तात्रय जाधव सर, सातारा जिल्हाध्यक्ष सचिनराव वायदंडे, सांगली जिल्हाध्यक्ष अरुण कुमार तेरदाळे,खटाव तालुकाध्यक्ष संतोषराव वायदंडे, पोफळज चे सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रक्षाळे बंधू यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर बिरुदेव केंगार (पत्रकार) यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.
उपस्थित बँन्ड बँजो चालकानी त्यांना सादरीकरण करत असताना किंवा येता जाताना येणाऱ्या अडचणी व होणाऱ्या नाहक त्रासाबाबत आपापली मतमतांतरे व्यक्त करत असताना तीव्र नाराजीचा सूर आळवला.आम्ही कलाकार लोकांनी व्यवसाय करायचा की प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जाच सोसायचा? अशा या होणाऱ्या त्रासा या मुळे ठरलेल्या ठिकाणावर वेळेवर पोहोचता येत नाही.त्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय नाहक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. अशा या प्रकारामुळे प्रपंच कसे सावरायचे? त्यात वाढती महागाई,कशाला कशाचा मेळ लावता येत नाही ? यासाठी संघटनेने शासन पातळीवरती होणाऱ्या प्रकार ची दखल घेऊन त्रासमुक्त सादरीकरणाचा व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावेत ही चालक कलाकारांच्या वतीने हात जोडून विनंती आहे. सदर समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रदेश सरचिटणीस सुभाषराव आडागळे साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व चालक व कलाकारांनी एकत्रित येऊन पूर्ण ताकदीनिशी लढा उभा केला तरच आपण या त्रासातून मुक्त होऊन इतर लोककलावंतासारखे आपण आपला व्यवसाय करू शकतो. सांगलीचे अरुण कुमार तेरदाळे यांनी तर अत्यंत पोट तिडकेने कलाकारांचा व चालकांचा समाचार घेत असताना ते स्पष्ट बोलले की संघटना गेली सहा सात वर्ष सातत्याने अशोकराव जाधवांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कार्यरत आहोत परंतु जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या लोकांनी सहभाग घेतला पाहिजे तो तेवढ्या प्रमाणामध्ये उभा राहत नाही हे अत्यंत शरमेची गोष्ट आहे. त्यासाठी प्रदेश सरचिटणीस सुभाषराव आडगळे यांनी सांगितल्याप्रमाणे आपण एकत्र आलोच पाहिजे? अन्यथा काहीही खरं नाही.
सातारा जिल्हाध्यक्ष सचिन राव वायदंडे साहेब यांनी तर आपल्या मनोगतामध्ये स्पष्ट सांगितले की आज पर्यंत सर व आणि आम्ही सहकारी पदाधिकारी सातत्याने न्यायाच्या भूमिकेतून प्रयत्न करतोय परंतु शासन स्तरावर ती सतत होणाऱ्या घडामोडीमुळे होणारे काम दिवसेंदिवस लांबत आहे. तरीसुद्धा आम्ही कुठेही कमी न पडता सातत्याने पाठवा करत आहोत. परवा तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या व्यथा त्यांच्यापुढे मी पोट तिडकीने मांडल्या. ते त्यांनी समजून घेऊन लवकरच बँड संघटनेच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ देणार आहे असा शब्द दिलेला आहे.बघू या? अध्यक्षपदावरून अशोकराव जाधव यांनी उपस्थित चालक कलाकारांच्या व्यथा व पदाधिकाऱ्यांच्या भूमिका बाबत जे विचार मांडले त्याबाबत सर्वांचे कौतुक तर केलेच. ते करत असताना या पुढील काळामध्ये सर्वांच्या विचाराने संघटनात्मक भूमिका घेऊन वाटचाल करावी लागेल? त्या साठी तुम्हा सर्व चालक व कलाकारांची वज्रमूठ एकट्टा बांधावी लागेल? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून संघटनेला एवढ्या आठ दहा दिवसांमध्ये भेटीचे निमंत्रण येईलच .त्यामधून आपल्या प्रलंबित प्रश्नांच्या मध्ये लोककलेची मान्यता, गाड्यांचा प्रश्न, प्रलंबित मानधन प्रकरणे, व नवीन कलाकारांसाठी संगीत शाळा याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी हजारो कलाकारांचा संबंधित मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये मेळावा करायचा आहे. नजीकच्या काळामध्ये होणाऱ्या वरील दोन्ही घटना मधून न्याय मिळाला तर ठीकच नाहीतर मी पुण्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आज इथेही सांगतो की सांगून समाजावून प्रश्न सुटत नसेल तर ते सोडवण्यासाठी आपल्या सर्व चालक व कलाकारांना आपलं सर्व साहित्य घेऊन रस्त्यावर उतरून एक मोठा मोर्चा मंत्रालयावर घेऊन जावा लागेल त्यावेळी मात्र ती आपली सत्वपरीक्षा ठरेल.ती जर लढाई आपण लढलो तर नक्कीच आपल्याला न्याय मिळू शकतो त्यासाठी आपण सर्वांनी त्याही तयारीला लागले पाहिजे त्याची आत्तापासून आपण सर्वांनी तयारी करावी. तरच उद्या आपल्याला आपला प्रपंच सुखासमाधानाने व्यतीत करायचा असेल तर लोकशाही मार्गाने लढण्याची तयारी सर्वांना ठेवावी लागेल . अध्यक्षीय भाषणानंतर जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या चालक-मालक लोकांच्या सहमतीने जिल्हा कार्यकारणीची निवड करून जिल्हाध्यक्ष,जिल्हा कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष,जिल्हा उपाध्यक्ष,खजिनदार, सरचिटणीस, कार्यकारी सदस्य यांची निवड करून संबंधित नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. सांगोल्याचे प्रांतिक सदस्य दत्तात्रय जाधव उपस्थितांचे आभार मानले.