मुंबई – धाराशिव लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी उध्दव ठाकरे यांची जाहीर संयुक्त सभा पार पडली.
या सभेत बोलतांना उध्दव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांचं कर्ज आहे म्हणता. नुसतं बाळासाहेब म्हणून नका, हिंदूहृदयस्रमाट म्हणा. हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ का कचरते. तुम्ही बाळासाहेबांचे विचार मानता. मग अमित शाह यांनी शब्द का मोडला? मी आईवडिलांची शपथ घेतली आणि तुळजाभवानीची शपथ घेत तुम्हाला सांगितल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी तमाम देशभक्तांच्या जल्लोषाने दणाणून निघालेल्या ह्या सभेत ‘भाजप तडीपार’ हाच स्पष्ट निर्धार दिसत आहे. ‘हुकूमशहाला आम्ही महाराष्ट्राचं पाणी पाजणारच’ ही शपथ घेऊनच प्रत्येक धाराशिवकर सभेला आला आहे. प्रत्येकाच्या मनात भाजपबद्दल राग आहे, चीड आहे. हुकूमशाही उलथवण्याची जिद्द आहे. ‘जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट येतं तेव्हा आम्ही सगळे जात-पात-धर्म विसरून, ‘महाराष्ट्रधर्म’ काय आहे हे आक्रमणकर्त्याला नेस्तनाबूत करुन दाखवून देतो,’ असा एल्गार करत, महाराष्ट्राची ताकद दाखवून दिली.
आता माझी सटकली, आता तुला इथून सटकवणार! pic.twitter.com/N8XGcF4e95
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 4, 2024