जळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

जळगाव – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जळगाव लोकसभा मतदार संघात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक लढविणार असल्याचे खात्रीलायक वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिले असून याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असून यासाठी देशातील चार लोकसभा मतदार संघाचा अभ्यास केंद्रीय उच्चस्तरीय समितीकडून पाहणी आणि चाचपणी दौरा करण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात नुकतेच नाशिक,पुणे आणि सोलापूर येथे येऊन गेले असून जळगाव जिल्ह्यातही ते ५ फेब्रुवारीला येणार आहेत. पंतप्रधानांचे दौरे पाहता हे कशाचे द्योतक आहे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

जळगाव जिल्हा हा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिला समजला जातो. तसेच सध्या महाराष्ट्राचेशह काटशहाचे राजकारण पाहता अनेक पक्षांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी, शरद पवार गट राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, वंचित आघाडी, एमआयएम, अशा अनेक लहान मोठ्या राजकीय पक्ष असल्याने आगामी लोकसभा निवडणुका लढवून अधिकाधिक जागा जिंकण्याचे आव्हान भाजपसमोर असून त्या दृष्टीने भाजपच्या व्युव्ह रचनेत जळगाव लोकसभा मतदार संघाची जागा नरेंद्र मोदी लढविणार आहेत. गेल्या चार टर्मपासून भाजपचा उमेदवार हा जळगाव मतदार संघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आला असून जळगावात लोकसभा निवडुकीच्या प्रचारासाठी जळगावात भव्य जाहीर सभा झाली होती. याच्या आठवणी जळगावकरांमध्ये ताज्या असताना पंतप्रधान जळगाव लोकसभा मतदार संघातुन निवडणूक लढविणार म्हटल्यावर जळगाव जिल्हा वासियांचे याकडे लक्ष लागले आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, अमळनेर पाचोरा भडगाव, आणि पारोळा एरंडोल असे सहा मतदार संघ असून तीन ठिकाणी शिंदे गट शिवसेना आमदार असून भाजपचे दोन आमदार तर राष्ट्रवादीचा एक आमदार असे पक्षीय बलाबल आहे. मात्र मागील काळातील इतिहास पाहता भाजपाला अनुकूल अशी जळगाव लोकसभा मतदार संघाची जागा आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हि निवडणूक सहज सोपी जाईल असे सूत्रांकडून समजत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब केल्यास जळगाव शहरासह जिल्ह्याचा विकास हा मोठ्या प्रमाणावर होऊन अनेक मोठे उद्योग जळगाव जिल्ह्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्याची यामुळे भरभराट होईल. त्यामुळे पंतप्रधानांकडून जळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. एवढे मात्र निश्चित … !

jalgaonsandesh

jalgaonsandesh