पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील १५ दिवसात जळगाव दौऱ्याची शक्यता

जळगाव – आयोध्यातील राम मंदिराच्या होतं असलेल्या २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर आणि आचारसंहितेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकासकामाच्या उदघाटनासाठी २८ जानेवारी किंवा ५ फेब्रुवारी रोजी जळगावच्या दौऱ्यावर येणार असल्याचे माहिती मिळत आहे.

या दौऱ्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे मात्र कुठलीही माहिती नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात ५ दौरे करणार आहेत. पहिल्या टप्प्यात शहरी दौरा होणार असून त्यानंतर ग्रामीण महाराष्ट्रातील दौरे होणार आहेत.

पुढील फेब्रुवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या आचार संहिता लागण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात पाच दौरे करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई, नाशिकच्या माध्यमातून पहिला दौरा तर २८ जानेवारी किंवा ५ फेब्रुवारी रोजी मोदी जळगावात येतील अशी माहिती स्थानिक पक्षीय सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांची जळगावात सभा होणार आहे. सभास्थळ निश्चित नसले तरी जिल्हा प्रशासनाने विमानतळ परिसर, शिरसोली रोड, नशिराबाद परिसरात ही सभा घेण्याची शक्यता वर्तविली आहे.

दौऱ्याची तारीख निश्चित नाही. मात्र या पंधरा दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा होईल, या दौऱ्यात विविध विकास योजनांचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सभा होईल, अशी प्राथमिक माहिती आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh