तालुका प्रतिनिधि भोकर : दत्ता बोईनवाड
भोकर स्वातंत्र्य दिनाचा 75 वा अमृत महोत्सव तथा आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्त भोकर तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने राबविलेले त्यात माजी सैनिकांचा सन्मान आणि दिव्यांग अपंगांच्या ज्येष्ठांचा सत्कार हा कार्यक्रम राबवून या दिनी कौतुकास्पद काम केल्याचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी व्यक्त केले आहे.

लोकनेते नागनाथ घिसेवाड यांचा सत्कार
बहुजन तथा काँग्रेसचे नेते श्री नागनाथ घिसेवाड यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या या वाढदिवसा निमीत्त या कार्यक्रमात त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रेस व संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संघाचे सचिव श्री सुभाष नाईक किनीकर यांनी केले तर हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे, उपाध्यक्ष दत्ताभाऊ बोईनवाड, सचिव सुभाष नाईक, संघटक माधव गायकवाड यांनी प्रयत्न केले.