सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

येथे महिला व पुरुषांसाठी ठिकठिकाणी शौचालय बांधण्यात आलेल्या आहेत मात्र वेळेवर साफसफाई केली जात नसल्याने शौचालयाची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. येथील श्री हनुमान मंदीराच्या बाजूला नदीच्या पात्रा कडून पुरुषाचे शौचालय आहेत मात्र अनेक महिन्यांपासून या शौचालयाची साफसफाई झालेली नाही तसेच या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने पुरुषांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तसेच वार्ड क्रमांक तीन मध्ये ही धामधरा नाल्या कडे असलेल्या महिला शौचालयाची अवस्था वाईट झाली आहे. तसेच बेलव्हाळ रस्त्यावर असलेल्या शौचालयाची साफसफाई केलेली नाही तर स्मशानभूमी रस्त्यावर असलेल्या महिला शौचालय परिसरात गवत वाढल्याने महिलांना रस्त्यावर शौचास बसावे लागत आहे. तर पुरुषांच्या शौचालया कडे लाईट व्यवस्था नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

या शौचालयाकडे लवकरात लवकर लक्ष देऊन शौचालयाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली जात आहे.