प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे साहेब यांनी दर महिन्याला ‘एम्प्लाय आॅफ द मंथ अवार्ड’ हा पुरस्कार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जाहीर केला आहे. त्यामुळे डिसेंबर २०२३ चा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला त्यात भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे कुऱ्हा पानाचे औट पोष्ट चे बीट हवालदार पोहेकाॅ युनूस मुसा शेख यांनी गुरनं २५१/२०२३ या गुन्ह्यात कलम ३९५ या गंभीर गुन्ह्यांमध्ये सखोल तपास केला त्यामुळे पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे साहेब यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात आला.
यावेळी पो नि बबनराव जगताप साहेब व पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल सुनसगाव चे पोलीस पाटील खुशाल पाटील व पत्रकार जितेंद्र काटे यांनी अभिनंदन केले.