जळगावमध्ये साकारण्यात येणार ‘पिंक टॉयलेट’

जळगाव – मुख्य रस्त्यांवर महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहराची गरज पाहता, मराठी प्रतिष्ठान व सुबोनियो केमिकल्सने याबाबत पुहकार घेतला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर महिलांसाठी सुसज्ज ५ ‘पिंक टॉयलेट’ स्वखर्चाने बनवून देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (ता. १) महापालिका प्रशासनाला देण्यात आला.

महानगरपालिका प्रशासनाने ‘पिंक टॉयलेट’साठी योग्य जागा, पाणी व विजेची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप’ प्रकल्पांतर्गत महापालिका प्रशासन, सुबोनियो केमिकल्स आणि मराठी प्रतिष्ठानतर्फे ‘पिंक टॉयलेट’ प्रकल्प शहरात राबविला जाईल.

दररोज स्वच्छतेची अपेक्षा

महिलांसाठीच्या ‘पिंक टॉयलेट’च्या दैनंदिन स्वच्छतेसाठी महापालिकेने दररोज स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा आहे. ‘पिंक टॉयलेट’ची देखभाल मराठी प्रतिष्ठान आणि सुबोनियो केमिकल्सतर्फे संयुक्तपणे करतील