चोपडा – अनवर्दे जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांचे मनबोल वाढण्यासाठी शिक्षणासोबत विविध कलाकृतींचे आवड निर्माण होण्यासाठी गणेश उत्सव निमित्त उर्वेश साळुंखे यांच्या संकल्पनेतून गणपती बाप्पाच्या चित्राला चित्र रंगवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला तिसरी व चौथीचे विद्यार्थी बसले होते. तिसरीला दोन व चौथीला दोन असे विद्यार्थ्यांची प्रथम व द्वितीय निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेला जे जे विद्यार्थी बसले होते.त्या प्रत्येक विद्यार्थ्याला कौतुकाची थाप म्हणून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र महाजन उपस्थित होते. व या गणेश उत्सव निमित्त घेतलेला स्पर्धेलेला शाळेतील शिक्षक गणेश सूर्यवंशी, लक्ष्मीकांत पाटील, पांडुरंग महाजन, सुचिता सैदाणै, वासुदेव नन्नवरे या शिक्षकांनी उर्वेश साळुंखेना स्पर्धा घेण्यात सहकार्य केले. स्पर्धा संपल्यानंतर गणेश सूर्यवंशी सरांनी स्पर्धेचे आयोजक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उर्वेश साळुंखे यांचे आभार मानले.
प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हेतूने व शिक्षण घेत असताना अनोख्या विषयांचे ही ज्ञान अवगत झाले पाहिजे प्रत्येक विषयाची आवड निर्माण व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मनातील इत्यादी गोष्टी लक्षात घेत स्पर्धेचे आयोजन केले होते.