अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी याचिका दाखल

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात उद्या म्हणजेच २८ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. प्रभारी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. हे प्रकरण प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सूचीबद्ध करण्यात आले आहे.

याचिका केव्हा दाखल झाली?

22 मार्च रोजी केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. स्वत:ला शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे दिल्लीचे रहिवासी सुरजित सिंह यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे. आर्थिक घोटाळ्याचा आरोप असलेल्या मुख्यमंत्र्यांना सार्वजनिक पदावर बसू देऊ नये, असे सुरजित सिंह यादव यांचे म्हणणे आहे. दिल्ली दारू धोरण प्रकरणी ईडीने २१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती.

jalgaonsandesh

jalgaonsandesh