सरकार विरोधात बोललं की पतीला इन्कम टॅक्सची नोटीस, सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला रोष

मुंबई – जेव्हा जेव्हा मी सरकारविरोधात बोलते तेव्हा माझ्या पतीला इन्कम टॅक्सची नोटीस अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे. तसेच अजित पवार यांच्यावरही सुळे यांना भाष्य केले.

आज सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की जेव्हा जेव्हा मी सरकारविरोधात बोलते तेव्हा तेव्हा माझे पती सदानंद सुळे यांना इन्कम टॅक्सची नोटीस येते. लोकसभेत अर्थसंकल्पावर मी टीका केली होती, तेव्हाही नोटीस आली होती. या नोटीसीला मी प्रेमपत्र म्हणते, आताही हे पत्र आले असेल. मी लोकसभेत किती वेळा बोलले आणि किती वेळा नोटीस आल्या याची आकडेवारीच मी फेसबुकवर टाकणार आहे, असे सुळे म्हणाल्या.

ताजा खबरें