2016मध्ये कोपर्डी येथे झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. तो येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. जितेंद्र शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. कारागृहात कैद्याची आत्महत्या होणे हे मोठी घटना असून याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे, नितिन भैलुमे आणि संतोष मवाळ या तिघांनी 13 जुलै 2016 रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे शालेय मुलीवर अत्याचार करून ठार केलं होतं. या प्रकरणी नोव्हेंबर 2017मध्ये तिन्ही आरोपींना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा दिली होती.