प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव व परिसरातील गावांमध्ये सध्या पापड कुरडया बिबडे तयारीला सुरुवात झाली असून महिला सकाळ पासून कामाला लागलेल्या दिसत आहेत. ज्या दिवशी पापड कुरडया बिबडे शेवाया तयार करण्यात येतात त्या दिवशी शेजारी पाजारी महिला एकत्र येऊन एकमेकांना मदत करतात जवळपास दोन तीन महिने हे काम सुरू असते.
काही महिला आपल्या शहरातील नातेवाईक मंडळींकडे गावाकडून पापड लोणची बिबडे तयार करून पाठवत आहेत.