पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे वैद्यकीय नीट परीक्षा शांततेत…..

हेमकांत गायकवाड

चोपडा : येथील सर्व सोयी सुविधा युक्त पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल ला दिनांक १२ सप्टेंबर रोजी वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीट घेण्यात आली. परीक्षेसाठी एकूण २४० पैकी २३१ विद्यार्थी व ४० पर्यवेक्षक उपस्थित होते. नीट बोर्डाचे प्रतिनिधी म्हणून शेख इरफान बशीर हे उपस्थित होते . केंद्र अधीक्षक म्हणून प्राचार्य मिलिंद पाटील, परीक्षा विभाग प्रमुख कृष्णकुमार शुक्ला तर उपविभागप्रमुख किरण चौधरी यांनी अथक परिश्रम घेऊन नीट परीक्षा यशस्वीरित्या पार पाडली. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अवतार सिंह चव्हाण व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे संचालक तथा रोटरी क्लब अध्यक्ष श्री पंकज बोरेले यांनी covid-19 संदर्भात सूचना दिल्या व परीक्षा यशस्वीतेसाठी मार्गदर्शन केले.

परीक्षेच्या दोन दिवस अगोदर पर्यवेक्षकांची मीटिंग घेऊन रंगीत तालीम घेण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादासो डॉ. सुरेश पंडित बोरोले उपाध्यक्ष श्री अविनाश राणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री एम. व्ही. पाटील, माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री व्ही. आर.पाटील ,कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक, पंकज इंग्लिश मिडीयम च्या प्राचार्या सौ‌. निता पाटील आदी उपस्थित होते.

परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमाचे फलित असल्याचे प्राचार्य मिलिंद पाटील यांनी सांगितले.