वडोदरा – सध्या पावसाळ्याचे दिवस असून दुषित पाण्याचा पाणीपुरी तयार करण्यासाठी वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी काही आजार पसरत असल्याने पालिकेने शहरात पाणीपुरी विक्रीवर बंदीचा निर्णय घेतला आहे.
गुजरातच्या वडोदरा मध्ये १० दिवस पाणीपुरी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पालिका अधिकार्यांनी काही ठिकाणी धाड टाकत पाणीपुरी बनवण्यासाठी वापरत असलेल्या पदार्थांची देखील तपासणी केली. यामध्ये निकृष्ट दर्जाचे पाणी, बटाटे वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
मागील काही दिवस अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. त्यानंतर जलजन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे लायसन्स शिवाय पदार्थ विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.