पाळधी सुगोकी हॉटेल जवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी ट्रॅव्हल उलटली; पालकमंत्री मदतीसाठी धावले..!

जळगाव – खामगाव वरून सुरतला लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स अपघात पाळधी गावाजवळ झाल्याची घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या खालती उलटून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्रॅव्हल्स गाडीत 38 प्रवासी असून अनेक प्रवासी जखमी झाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील घटनास्थळी जाऊन जखमींना मदत केली आहे.

जळगाव जिल्ह्यात महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू असून रविवार रात्री नऊच्या सुमारास पाळधी गावाजवळील सुगोकी हॉटेल जवळ खामगाव येथून लग्नाचे वऱ्हाड सुरतला घेऊन जाणारी खाजगी ट्रॅव्हलचा अपघात झाल्याची घटना घडली. ट्रॅव्हल चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल थेट महामार्गाच्या खालती उतरून खड्ड्यात उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत ट्रॅव्हल मधील अनेक प्रवासी जखमी झाल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ग्रामस्थांकडून तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदतकार्य केले जात आहे.पाळधी गावाजवळ जवळ ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना माहिती पडतात. त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमींना मदत कार्य सुरू केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh