“पडळकर म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेला बाबा, पक्षाला आग लावून त्याच भट्टीवर…”

मुंबई – शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून, ती काढून टाकायला हवी असं वादग्रस्त वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी इंदापुरमध्ये केलं आहे. या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आ. अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे पडळकरांवर टीकास्त्र डागले आहे.

मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे. शरद पवारांचं नुसतं नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा… याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल.”

काय म्हणाले होते पडळकर?

शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. परंतु राज्यातील दुष्काळी भागात त्यांनी कधीही पाणी पोहचले नाही. केंद्रीय कृषिमंत्री असतानाही त्यांना राज्यात पैसा आणावासा वाटला नाही. त्यामुळे शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ती काढून टाकायला हवी. शरद पवार यांना भावी पंतप्रधान करायचे असेल तर तीन वेगळी राज्य करावी लागतील. लवासा, बारामती, आणि एक मगरपट्टा. मगरपट्टयाचे मुख्यमंत्री जयंत पाटील, लवसाच्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे आणि बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवार यांना करा. ही तिन्ही राज्य एकत्र करून देश करा. त्याचे पंतप्रधान शरद पवारांना करा, असा टोलाही पडळकरांनी लगावला होता.

jalgaonsandesh

jalgaonsandesh