१७ ऑगस्ट रोजी अमळनेर येथे सर्व धर्म परिषदेचे आयोजन

अमळनेर :- अमळनेर महिला मंच ट्रस्ट व पोलीस स्टेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी बन्सीलाल पॅलेस , प्रताप मिल परिसर अमळनेर येथे दुपारी ३.३० वाजता ‘सर्व धर्म परिषद’ चे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेत प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ, साध्वीची प्रमिदिता श्री जी मसा, भिख्खू नागसेन, मकसूदभाई बोहरा, भाईसाब घनश्याम तोलानी जग्यासी, ग्रेव्ह दरबारी , मुफ्ती हरून नदवी, रेव्हरंड विशाल वळवी, वेदमूर्ती भगवतकार अमोल शुक्ल यांना आपापले विचार मांडण्या करिता निमंत्रित करण्यात आले असून समालोचक म्हणून प्रसिद्ध विधीज्ञ ऍड. सुशील अत्रे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. अपर्णा मुठे, सरोज भांडारकर, कांचन शहा, वसुंधरा लांडगे तसेच अमळनेर पोलीस स्टेशन यांनी केले आहे..

jalgaonsandesh

jalgaonsandesh