ममुराबाद ग्रामपंचायत मध्ये १४ वा वित्त आयोगाच्या निधीत अपहार, शासकिय रक्कम १२.१८००० हजार वसुलीचे आदेश

जळगाव – : तालुक्यातील ममुराबाद ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच हेमंत गोविंद चौधरी व ग्रामसेवक मुरलीधर एकनाथ उशिर यांच्याविरुध्द १४ व्या वित्त आयोगातील निधीतील अपहार व कामकाजातील अनियमिततेचा आरोप सिध्द झाल्यामुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव यांना दिनांक २ मे रोजी एका पत्राद्वारे सरपंच तथा ग्रामसेवक यांनी १४ वा वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार व अनियमीतते बाबत १२,१८००० (बारा लाख अठरा हजार ) रुपये इतक्या शासकीय रकमेची वसुली संदर्भात आदेश देण्यात आले आहे. तसेच या व्यवहारास जबाबदार धरून तत्कालीन ग्रामसेवक मुरलीधर उशीर हल्ली कार्यरत ग्रामपंचायत म्हसावद तालुका जिल्हा जळगाव यांचे विरुद्ध प्रशासकीय कारवाई करणे कामे दोषारोप पत्र तयार करण्याचे देखील आदेशात म्हटलेले आहे.

ममुराबाद ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी गावाच्या ग्रामस्थांनी हेमंत गोविंद चौधरी यांना सरपंचपदी निवडून दिले.काही महिन्यांपासून  ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमितता होत असल्याबाबत तक्रारदार महेंद्र सोनवणे ( संपादक सा. जळगाव संदेश ) यांनी बऱ्याच वेळेस वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या.

त्या तक्रारी संदर्भात बर्याच वेळेस वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करूण देखील कोणत्याच प्रकारची कारवाई होत नव्हती परंतु तक्रारदार यांनी सरपंच व ग्रामसेवकाच्या दडपशाहीस न जुमानता ग्रा. पं. मधील अनियमितता व्यवहाराची चौकशी करून दोषीवर कारवाईची मागणी लावून धरली. तक्रारदार यांनी केलेले हे सर्व आरोप गटविकास अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये खरे आढळून आले.                                  त्यामुळे तक्रारदार यांच्या तक्रारीची दखल घेऊन दिनांक २ मे रोजी जि प चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे ममुराबाद ग्रामपंचायत मध्ये झालेल्या चौदावा वित्त आयोगाच्या निधीच्या रक्कमेचा अपहार व अनियमीततेबाबत शासकीय रकमेच्या वसुली बाबतचे आदेश दिलेले आहेत.

गैरव्यवहाराचा कळस

जि. प. शाळेसाठी साहित्य,आंगणवाडी साठी साहित्य, ग्रामपंचायत कार्यालयासाठी फर्निचर, महिला बचत गटांना प्रशिक्षण अशांनसाठी १४ वा वित्त आयोगाचा जवळपास १२.१८००० (बारा लाख अठरा हजार रुपये ) निधी खर्च करण्यात आला मात्र सदर निधी खर्च करताना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता व अजिंडियावर सदर खर्चाबाबत विषय न घेता खर्च करण्यात आलेला आहे.तसेच शालेय साहित्य ग्रामपंचायत साठी फर्निचर खरेदी करताना सर्व शासनाचे नियम धाब्यावर बसवून साहित्य अहवाच्या संवादाराने खरेदी केलेले आहे.तसेच सर्व साहित्य स्थानिक मार्केट मधून न खरेदी करता बाहेरच्या मार्केटमधून खरेदी करण्यात आलेले आहे.त्याचप्रमाणे महिला बचत गटांना प्रशिक्षण देताना सुद्धा मोठ्या प्रमाणात निधीचा अपहार करण्यात आला आहे.एक लाख ऐंशी हजार रुपये महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यासाठी खर्च करण्यात आले मात्र महिला बचत गटाच्या महिलांना कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही.सदर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत ममुराबाद या नावाने देण्यात आलेले आहे.

अशा प्रकारे १४ वा वित्त आयोगाच्या निधीमध्ये अनियमीतता तसेच मोठ्या प्रमाणात अपहार झालेला आहे. १४ वित्त आयोगाच्या शासकीय रक्कमेच्या वसुली सोबत संबंधित दोषी असलेल्या सरपंच हेमंत चौधरी तसेच ग्रामसेवक मुरलीधर उशीर यांचेवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी तक्रारदार महेंद्र सोनवणे यांनी केलेली आहे.

ताजा खबरें