या उन्हाळय़ात होणार नाही वीजकपात

पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने महायोजना क्रियान्वित

उन्हाळय़ाच्या दिवसांमध्येही देशात वीजेची टंचाई निर्माण होऊ नये आणि वीजकपात करावी लागू नये, अशी योजना केंद्र सरकारने क्रियान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत सर्व विद्युतनिर्मिती केंद्रांना उन्हाळय़ात वीज उत्पादन कमी होऊ नये यासाठी आतापासूनच उपाय योजना करण्याची सूचना देण्यात आली आहे. सर्व विद्युत केंद्रांनी कोळशाचा पुरेसा साठा आतापासूनच करुन ठेवावा. केंद सरकार त्यांना यासाठी आवश्यक ते साहाय्य करेल. आतापासूनच वीजेची मागणी आणि पुरवठा यांचे सूत्र ठरवून घ्यावे. कोणत्या काळात वीजेची मागणी वाढते त्याचे अनुमान आधीच काढून त्यासाठी सोय करुन ठेवावी. आधीपासून सज्जता असल्याने समस्या येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय वीजमंत्र्यांची योजना

केंद्र वीज उत्पादन आणि वितरण मंत्री आर. के. सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उन्हाळय़ाच्या दिवसांसाठी ही विशेष वीजउत्पादन योजना सज्ज केली आहे. एप्रिल 2023 आणि मे 2023 या महिन्यांसाठी ती लागू केली गेली आहे. यासाठी त्यांनी वीजनिर्मिती आणि वीजवितरणाशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा केली असून या विचारमंथनातून ही योजना साकारली आहे.

वायूआधारित उत्पादन वाढविणार

केंद्रीय वीज विभागाने राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती संस्थेला (एनटीपीसी) एप्रिल आणि मे महिन्यात अनुक्रमे 4000 आणि 5000 मेगावॅट अतिरिक्त वीज उत्पादन करण्याचे आदेश दिले आहेत. ही वीज नैसर्गिक वायूच्या आधारे निर्माण केली जाणार असून त्यासाठी सज्जता राखण्यास सांगण्यात आले आहे. या वायू संयंत्राना याच महिन्यात सुरु करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh