‘या’ तारखेआधी पॅनकार्ड आधारशी लिंक करा; अन्यथा बसेल फटका!

मुंबई – आयकर विभागाकडून  पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक  करण्यासंबंधात एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. करदात्यांचे पॅनकार्ड आधारशी लिंक नसल्यास त्यांनी लवकरात लवकर दोन्ही कार्डाची जोडणी करावी. अन्यथा करदात्यांना मोठा फटका बसू शकतो असे आयकर विभागाने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करदात्यांचे जास्त दराने कर कपात होऊ नये यासाठी आयकर विभागाने करदात्यांना पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्यास सांगितले आहे. आयकर विभागाकडून याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही अनेक नागरिकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे आयकर विभागाने ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट करत नागरिकांना या गोष्टीची पुन्हा आठवण करुन दिली आहे.

३१ मे या तारखेआधीच करदात्यांनी दोन्ही कार्ड लिंक करणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा नागरिकांना लागू दराच्या दुप्पट दराने टीडीएस भरावा लागणार, असं ट्विट आयकर विभागामार्फत करण्यात आलं आहे.

असं करा लिंक 

आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

Quick Links या सेक्शनवर क्लिक करा, त्यामध्ये Link Aadhar पर्याय निवडा.

तुमचं पॅन आणि आधार क्रमांक नोंदवून Validate बटणवर क्लिक करा.

आधार कार्डमध्ये असलेलं नाव, मोबाईल नंबर नोंदवा, नंतर लिंक आधारवर क्लिक करा.

तुमच्या मोबाईल नंबर येणाऱ्या ओटीपीसह validate वर क्लिक करा.

पॅन-आधार लिंक स्थिती अशी तपासा

अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.incometax.gov.in/iec/foportal/ आणि ‘क्विक लिंक्स’ विभागात ‘लिंक आधार स्टेटस’ हा पर्याय निवडा.

तुमचा पॅन आणि आधार क्रमांक एंटर करा, त्यानंतर ‘आधार स्टेटस लिंक पहा’ बटणावर क्लिक करा.

यशस्वी पडताळणीनंतर तुमचा पॅन आणि आधार लिंकिंग स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

UIDAI अजूनही तुमच्या विनंतीवर प्रक्रिया करत असल्यास, तुम्हाला पुन्हा तुमचे आधार लिंक करावे लागेल.