जळगाव – ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री परशुराम जयंती निमित शोभा यात्रा काढण्यात आली.या शोभा यात्रेत प्रथमच महिलांचा दांडिया खेळण्यात आले. ‘जय परशुराम बोलो जय परशुराम’ या गाण्याचा तालावर महिलांची पावले दांडियात थिरकली
बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष नितीन पारगावकर, महिला अध्यक्ष वृंदा भालेराव, सुधा खटोड,छाया त्रिपाठी, श्रीकांत खठोड यांच्या उपस्थितित सुभाष चौकातुन शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी नंदिता जोशी ने डोक्यावर कळसी ठेवून फायर नृत्य केला तसेच चित्तथराक प्रात्यक्षिक पुजा दायमा व नंदिता जोशी ने ढाल तलवार बाजीने प्रेक्षकांचे मने जिंकुन लक्ष वेधले व टाळ्या मिळवल्या. दांडियात
प्रियंका त्रिपाठी, अनुराधा दायमा, पुजा दायमा, नंदिता जोशि, मंगला दायमा, राजेश्रि पारेख, सपना शर्मा, कोयल पुरोहित, प्रिया ओझा, लक्ष्मि शुक्ला, ऐश्वर्या नागोरि, माधुरि सारस्वत, स्मिता पंडित, बबिता उपाध्याय, ज्योति पुरोहित, मंजु पुरोहित, यांनी सहभाग घेतला असुन नरेश बागडे यांनी दांडिया चे प्रशिक्षण दिले.