14 एप्रिल निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या ताऱ्याची झाली रजिस्ट्री; आपल्याला पाहता येणार थेट मोबाइलवरून तारा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला 132 वी जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे,संपूर्ण देशभरात मोठा उत्साह समजला जातो. भीमसैनिकांकडून महिनाभरापूर्वी आगळे वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी नियोजन केले जाते. मात्र यंदाची भीम जयंती ही हटके आणि ऐतिहासिक ठरणार आहे.

त्याच कारण असे की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याची रजिस्ट्री करण्यात आली आहे. तर 14 एप्रिल 2023 रोजी या ताऱ्याचं नामकरण होणार आहे. तर सर्वसामान्यांना हा तारा थेट आपल्या मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर पाहता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी या तार्‍याची रजिस्ट्री केली आहे

अमेरिकेत अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी ‘इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री’ नावाची एक संस्था असून, या संस्थेमार्फत अवकाशातील ताऱ्यांना व्यक्तींची नावं देण्यात येतात. यासाठी भारतीय चलनात नऊ हजार रुपये शुल्क भरावे लागते. यंदाची भीम जयंती आगळीवेगळी व्हावी म्हणून राजू शिंदे यांनी, या संस्थेकडे बाबासाहेबांच्या नावे ताऱ्याची नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. शिंदे यांनी 9 फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता आणि आता त्यांना त्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. तर 14 एप्रिलला या ताऱ्याचं लाँचिंग होणार असून,

{ https://space-registry.org }

या स्पेस रजिस्ट्री ॲपच्या संकेतस्थळावरून हा तारा पाहता येऊ शकतो. तसेच मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर हा तारा पाहता येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गावागावात बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने रॅली काढली जाते. मात्र यावेळी ‘जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेंगा’ अशी घोषणा दिली जाते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत देखील ही घोषणा देण्यात आली होती. त्यामुळे ही घोषणा लक्षात घेता राजू शिंदे यांनी बाबासाहेबांच्या नावाने अवकाशातील ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे कोणालाही आपल्या नातेवाइकांचा किंवा स्वतःचं नाव या ताऱ्याला देता येत नाही. यासाठी नाव दिले जाणाऱ्या व्यक्तीचे खूप व्यापक काम असायला हवं, त्यासाठी संबंधित संस्थेकडून विविध कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यामुळे तब्बल दीड महिन्यापासून प्रक्रिया करत आणि वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर  अखेर आकाशातील तार्‍याला बाबासाहेबांचं नाव मिळालं असल्याचं राजू शिंदे हे बोलतांना म्हणाले