गोजोरा – चोरवड रस्त्यावर मृत मासे फेकल्याने दुर्गंधी.

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील चोरवड – गोजोरा रस्त्यावर अज्ञाताने मेलेले मासे असलेला ट्रे फेकून दिल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

या मेलेल्या माशांची दुर्गंधी एवढी पसरली आहे की या ठिकाणाहून जाताना अनेकांना उलट्यांचा त्रास होतो आहे. मृत मासे फेकल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने केला असावा असे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वी सुनसगाव वाघुर नदीच्या पात्रात अशाच प्रकारे मृत माशांचे ट्रे अज्ञात व्यक्तीने फेकले होते. त्यावेळी सुद्धा नदी पात्रातील पाणी दूषित झाले होते. असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.