‘अनुपमा’ फेम अभिनेत्याचा हृदयविकाराने मृत्यू…

टीव्ही अभिनेता नितेश पांडे यांचे 23 मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या केवळ 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘अनुपमा’ प्रसिद्ध शोमध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारून ते घराघरात लोकप्रिय झाले होते.

त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.त्याच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

लेखक सिद्धार्थ नागर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी यापूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकून याबाबत माहिती दिली आहे.

वृत्त संस्थेशी बोलतांना सिद्धार्थ नगर यांनी सांगितले की, नितीश एका कार्यक्रमातून परतत असताना त्यांना नितीश पांडे यांच्या निधनाची बातमी मिळाली, नितीश शूटिंगसाठी इगतपूरला गेले होते. तेथे रात्री दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

मात्र, मृतदेह केव्हा आणण्यात आला आणि अंत्यसंस्कार केव्हा होणार याबाबत त्यांना फारशी माहिती नाही.

नितीश पांडे यांचा जन्म १७ जानेवारी १९७३ रोजी झाला. नितेश पांडे यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले होते. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातही त्यानी शाहरुख खानच्या असिस्टंटची भूमिका साकारली होती.

यासह, ते ‘बधाई दो’, ‘रंगून’, ‘हंटर’, ‘दबंग 2’, ‘बाजी’, ‘मेरे यार की शादी है’, ‘मदारी’ आणि ‘खोसा का घोसला’ यांसारख्या इतर अनेक चित्रपटांच्या माध्यमातुन त्यांनी प्रेक्षकांच मनोरंजन केले.

त्याबरोबरच ते दिशा परमार आणि नकुल मेहता स्टारर शो ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार’ मध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh