‘तुझसे नाराज नही जिंदगी’ फेम गायक अनूप घोषाल यांचे निधन

मुंबई – मनोरंजन विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बंगाली गायक आणि तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार अनुप घोषाल यांचे शुक्रवारी निधन झाले. 1983 मध्ये आलेल्या ‘मासूम’ या चित्रपटातील ‘तुझसे नाराज नही जिंदगी’ या गाण्याला त्यांनी आपला आवाज दिला होता.

वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वयाशी संबंधित आजारांमुळे त्यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी 1.40 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. गायकाच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अनूप घोषाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुप घोषाल यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी झाली आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अनुप घोषाल हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारांने त्रस्त होते, त्यामुळे त्यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले.

तपन सिन्हा सारख्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात त्यांनी गाणे गायले होते. अनूप घोषाल यांनी सत्यजित रे यांच्या ‘गुपी गायन, बाघा बायन’ (1969) आणि ‘हिरक राजार देशे’ (1980) ला आपला आवाज दिला आहे.

अनुप घोषाल यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “बंगाली, हिंदी आणि इतर भाषांमध्ये गाणारे अनुप घोषाल यांच्या निधनाबद्दल मी तीव्र दु:ख आणि शोक व्यक्त करते. उस्ताद घोषाल यांची कारकीर्द वयाच्या अवघ्या चार वर्षापासून सुरू झाली. त्यांची आई लावण्य घोषाल यांनी त्यांचे पालनपोषण केले.”

jalgaonsandesh

jalgaonsandesh