अहिंसा हा फक्त शब्द नाही तर मानवी जीवनाचा क्रियात्मक सिद्धांत आहे :- डॉ.शालिनी चौधरी

चोपडा : २ ऑक्टोबर, अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिसा दिन म्हणून साजरा केला जातो.

या अनुषंगाने महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजना एकका मार्फत ऑनलाइन
व्याख्यान आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी हे होते. त उत्तराखंड ओपन यूनिवर्सिटी,हलद्वानी येथील अर्थशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ शालिनी चौधरी ह्या प्रमुख वक्त्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना एककाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी के लभाने यांनी केले. डॉ.शालिनी चौधरी यांचा परिचय राष्टीय सेवा योजना एकाकाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विशाल हौसे यांनी करताना डॉ.शालिनी चौधरी यांनी आतापर्यंत सामाजिक,सांस्कृतिक व अकॅडेमिक क्षेत्रात साधलेल्या प्रगतीचा आलेख मांडला.डॉ. शालिनी चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात महात्मा गांधीजे साहित्य इतके विशाल आहे की आज च्या काळात देखील त्यांचे बरेचसे विचार समकालीन वाटतात म्हणूनच आपण 2007 पासून 2 ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा करीत आहोत.
आज अहिंसा या शब्दाला फार मर्यादित अर्थाने पाहिले जाते,महात्मा गांधी च्या विचारधारेतील अहिंसा या संकल्पनेला खूप व्यापक अर्थ आहे. हिंसा म्हणजे केवळ पशूला शारीरिक इजा पोहचवणे हेच नव्हे तर एखाद्या व्यक्तीला त्याचे मानसिक व शारीरिक कष्ट देणे ,अभिव्यक्तीचे स्वतंत्र हिरावून घेणे,एखाद्या व्यक्तीला एकटे पाडणे, एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीचे पूर्वग्रह पसरवणे या सारख्या सर्व क्रिया ह्या देखील विदारक हिंसेसारख्याच आहेत.त्यामुळे प्रत्येकाला निडर बनावे लागेल .जो व्यक्ती निडर नसेल तो कधीच अहिंसेचा पाईक होऊ शकत नाही.चुकीला चूक व सत्याला सत्य म्हणायची निर्भय ताकद आपण एकवटू शकत नसू तर अप्रत्यक्षपणे आपण देखील हिंसेचे वाटेकरीच ठरतो.त्यामुळे अहिंसा हा केवळ शब्द नाही तर मानवी जीवनाचा एक क्रियात्मक सिद्धांत आहे .जो प्रत्येक व्यक्तीनी आपल्या आयुष्यात अंगीकारला पाहिजे सत्य सर्वोच्च कायदा आहे तर अहिंसा सर्वोच्च कर्तव्य ही जीवनशैली स्वीकारली तरच खऱ्या अर्थाने आजच्या दिवस साजरा करण्याचे फलित मिळेल.राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधवाक्य Not Me But you हे गांधीजींच्या विचार प्रेरणेतूनच आले आहे .त्याचा उलगडा केला. आजच्या युगात गांधीजीच्या जीवनशैलीचा वापर करून कसे पुढे जाता येईल त्यासाठी त्यांनी सांगितलेली मूल्य आपल्याला जोपासावी जसे की साधी राहणी उच्च विचारसरणी,प्रेम,दया,सत्य,त्याग इ . आजचा युवकानी महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांची पुस्तके वाचावी असे आवाहन त्यांनी आपल्या व्याख्यानात केले. महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.डी. ए.सूर्यवंशी यांनी सुद्धा आपल्या अध्यक्षीय भाषणात गांधींच्या विचारांचा उलगडा केला तसेच राष्ट्रीय सेवा योजना एककाचे महाविद्यालयातील योगदानाच्या उल्लेख केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.टी पाटील,एन. एस. कोल्हे, डॉ के. एन. सोनवणे, रजिस्टर डी.एम. पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक कु. मोक्षिका सुलताने हीने केले तर आभार स्वयंसेवक संदीप भदाणे यानी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ.सुनीता पाटील,डॉ लालचंद पटले तसेच डी एस पाटील यांचे सहकार्य लाभले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh