NHPC Recruitment : सरकारी नोकरीसाठी तरूणांना नामी संधी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू

‘या’ तारखेआधीच करा अर्ज अन्यथा होईल नुकसान

मुंबई : सध्या अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशाच नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांना NHPCने नामी संधी दिली आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) लिमिटेडच्या मोहिमेंतर्गत एक दोन नव्हे तर चक्क ५७ पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवार भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. त्याआधी नोकरीसाठीची शैक्षणिक पात्रता, पद, अर्जाची प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख यासंबंधीची सर्व माहिती जाणून घ्या.

NHPC मध्ये भरण्यात येणारी पदे –

फिटर- २ पदे

इलेक्ट्रिशियन – १३ पदे

ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – २ पदे

सर्वेक्षक – २ पदे

प्लंबर- २ पदे

COPA (संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग हेल्पर) – १८ पदे

डिप्लोमा अप्रेंटिसशिप नागरी- ५ पदे

इलेक्ट्रिकल- ४ पदे

GNM (जनरल नर्सिंग आणि मिडवाइफ) – ४ पदे

पदवीधर प्रशिक्षणार्थी नर्सिंग- २ पदे

हॉटेल मॅनेजमेंट- १ पोस्ट

फार्मासिस्ट पदवीधर- २ पदे

एकूण पदांची संख्या- ५७

NHPC मध्ये फॉर्म भरण्यासाठी अर्ज शुल्क –

या NHPC शिकाऊ भरती २०२४ साठी अर्ज करण्याचा विचार करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

असा करा अर्ज-

तुमच्याकडे आयटीआय, डिप्लोमा किंवा तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी येथे काम करण्याची उत्तम संधी आहे. यासाठी NHPC ने प्रशिक्षणार्थी पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते NHPC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने थेट http://www.nhpcindia.com या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी कोणत्या पात्रता आहेत?

जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून आयटीआय प्रमाणपत्र, अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान डिप्लोमा आणि संबंधित व्यापारात पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.

NHPC मध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा –

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे दरम्यान असावी. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील.

या तारखेआधीच करा अर्ज

NHPC येथील जाहीर केलेल्या पदांवर काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२४ असणार आहे.

NHPC Recruitment 2024 : अधिसूचना –

https://www.nhpcindia.com/assests/pzi_public/pdf_link/661d17d003721.pdf