नवा ट्विस्ट! बृजभूषण यांच्याविरोधात सूड भावनेने खोटी तक्रार केल्याची अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांची माध्यमांसमोर कबुली

नवी दिल्ली –  केंद्र सरकार आणि कुस्तीपटूंमधील चर्चेत बृजभूषण यांच्याविरोधात कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतले. मात्र कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर या प्रकरणात नविन ट्विस्ट निर्माण झाले आहे. कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या प्रकरणात नवा आणि खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.

ज्या अल्पवयीन कुस्तीपटूनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, तिच्या वडिलांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केली होती. बृजभूषण यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय त्यांच्या मुलीचा नसून त्यांचा होता, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, बृजभूषण सिंह यांनीही अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “त्यांच्या मनात कोणासाठीही वाईट भावना नाहीत. माझ्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी अल्वयीन मुलीची दिशाभूल केली, त्यामुळे तिच्या हातून एवढी मोठी चूक घडली. माझ्या मनात तक्रारदार कुस्तीपटू किंवा तिच्या कुटुंबाबद्दल कोणतीही वाईट भावना नाही. त्याच्या कुटुंबावर कारवाई करण्याची माझी मागणी नाही. पण यातून मला बदनाम करण्याचा हा कट असल्याचं सिद्ध झालं आहे.”

ताजा खबरें