नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेल येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर

जिल्हा प्रतिनिधी: शिवानंद उप्पे

नांदेड( दि.०५) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय मरखेल येथील तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजना दि.२४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ दरम्यान मरखेल ता.देगलूर येथे विशेष श्रमदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सात दिवसाच्या श्रमदान शिबीरामध्ये ग्रामसमृद्धी विशेष कार्यक्रम राबविण्यात आले होते. यामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, माझा वसुंधरा अंतर्गत वृक्ष लागवड, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती निर्मुलन, इत्यादी उपक्रमातून प्रबोधन करण्यात आले. यामध्ये गावातील दर्शनीय ठिकाण,मंदिर, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी स्वंयसेवकामार्फत स्वच्छता करण्यात आली.माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत एक विद्यार्थी एक झाड संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्रा.पी.एस.पाटील यांनी माती परीक्षणाचे महत्व या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले तर प्रा. एस.बी. बसवंते यांनी ई पीक पाहणी या विषयावर प्रबोधन केले तसेच महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कृषी विषयक विविध विषयावर प्रबोधन केले.

यावेळी या महाविद्यालयाचे सहसचिव बबनराव पाटील गोजेगावकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर राष्ट्रीय सेवेत भाग घ्यावा असे आवाहन केले व मोलाचा सल्ला दिला.हा कार्यक्रम प्रा.एस.आर.मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सर्व कामे पार पाडली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.आर.एस . मुळे,प्रा.एस.एम.चौधरी, डॉ.एस.सी.आवताडे,प्रा.एस.डी. नाईक,प्रा.एस.बी.अंबुरे,प्रा.व्ही. जी.गोडेकर,प्रा.ए.एस.सापेकर, प्रा.एन.बी.राठोड,प्रा.पी.बी.भालेराव,प्रा.भाग्यलक्षी यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कवळे कृष्णा तर प्रास्ताविक प्रा.एम आर मुळे यांनी केले.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनोज सरसंबे यांनी केले. यावेळी गावातील प्रकाश देशमुख, बलभीम रावसाहेब, गणेश कोमावार व असंख्य मान्यवर उपस्थित होते.

ताजा खबरें