नेपाळ दुर्दैवी अपघातातील मृतांचे 47 सहप्रवासी विशेष रेल्वे सुविधेत गावी परतले

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – येथून दि.२३ रोजी नेपाळमध्ये दर्शनासाठी गेलेल्या 43 प्रवाश्यांची 1 बस दरीत कोसळून जळगांव जिल्ह्यातील एकूण 25 प्रवाश्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यावेळी त्यांच्यासह असलेले दुसऱ्या बसमधील एकूण 47 सहप्रवाश्यांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या विनंती वरून रेल्वे विभाग मार्फत विशेष एसी बोगी उपलब्ध करण्यात येऊन, त्यांना गोरखपूर येथून रेल्वेद्वारे भुसावळ स्टेशन येथे सोडण्यात आले. यावेळी रेल्वे मार्फत प्रवाश्यांसाठी नाश्ता, जेवण, पाणी यासारख्या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या.

रात्री 9 वा रेल्वे  भुसावळ स्टेशन येथे पोहचली असता डीआरएम श्रीमती इति पांडे यांनी उपस्थित राहून सर्व प्रवाश्यांची विचारपूस करून, प्रवाश्यांना आपआपल्या घरी सोडण्याची व्यवस्था केली. यासाठी रेल्वे विभाग मार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री श्री.अश्विनी वैष्णवजी व रेल्वे विभागाचे आभार मानले.