नवीन नांदेडात जबरी चोरी; रोख सहा लाखांसह सुमारे ३५ ते ४० लाख रूपयांचे दागिनेही लंपास

नांदेड ग्रामीण पोलिसांची विशेष कामगिरी;पाच तासात मुद्देमालासह आरोपींनाही घेतले ताब्यात 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:उद्धव मामडे रावधानोरकर

नांदेड: तीन आरोपींनी एका विवाहितेस चाकू तथा खंजरचा धाक दाखवून रोख पाच ते सहा लाख रूपयांसह सुमारे ५० ते ६० तोळे सोन्याचे दागिने व एक किलो चांदी असा एकूण तब्बल ३५ ते ४० लाख रूपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला. ही घटना २६ ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजेचेदरम्यान, नांदेडच्या ‘सिडको’ वसाहतीतील ‘वात्सल्य’नगर गृहनिर्माण सोसायटीत घडली. मात्र, नांदेड ग्रामीण पोलिसांनी फक्त चार-पाच तासात या प्रकरणातील मुळमुद्देमालासह मुख्य सूत्रधार तसेच त्याच्या अन्य तीन सहकारी आरोपींच्याही मुसक्या आवळले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या ‘सिडको’ वसाहतीअंतर्गत असलेल्या वात्सल्यनगर सोसायटीतील रहिवासी गोविंदराज दाचावार यांची पत्नी अंकीता गोविंदराज दाचावार या २६ ऑगस्ट रोजी दुपारी त्यांच्या दिड वर्षाच्या चिमुकल्यासह घरी एकटयाच होत्या. दरम्यान, अज्ञात तीन आरोपींनी गुरूवारी दुपारी बारा ते साडेबारा वाजेदरम्यान, उपरोल्लेखित संधीचा फायदा घेत व्यापारी दाचावार यांच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात प्रवेश केला. त्याचवेळी,आरोपी तीन चोरटयांनी अंकीता दाचावार यांना चाकूचा धाक दाखवून घरातील कपाटातील रोख पाच-सहा लाख रुपयांसह सुमारे ५० ते ६० तोळे सोन्याचे दागिने तसेच एक किलो चांदी असा एकूण तब्बल ३५ ते ४० लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला. उपरोक्त घटनेची माहिती समजताच नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, डीवाय.एस.पी. डॉ. सिध्देश्वर भोरे, नांदेड ग्रामीण ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पो. नि. विश्वजित कासले, पोउपनि. आनंद बिच्चेवार व डी.बी तथा गुन्हे शोध पथकाचे पोउपनि. शेख असद आणि त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

विशेष बाब म्हणजे, उपरोल्लेखित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केल्यानंतर प्रस्तुत घटना गोविंदराज दाचावार यांच्या कुटुंबातील ‘एखाद्या’ सदस्यांच्या सहभागाशिवाय ही घटना घडली नसावी, असा संशय पोलीस अधिकाऱ्यांना आला. विशेष म्हणजे, घटनास्थळाची पाहणी करीत असताना पो.नि. अशोक घोरबांड व गुन्हे शोधपथकाचे पोउपनि. शेख असद यांना प्रस्तुत घटनास्थळी संशयास्पद वावरणारे श्रीनिवास दिलीपराव दाचावार याचा संशय आला. त्याचवेळी, नांदेड ग्रामीण ठाण्यातील गुन्हे ‘शोध’ पथकाचे पोउपनि. शेख असद व त्यांच्या अन्य सहकारी कर्मचाऱ्यांनी पोनि. अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली गोविंदराज दाचावार यांचा सख्खा चुलत भावास म्हणजेच, श्रीनिवास दाचावार यास ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी सुरू केली. त्याचवेळी, नांदेड ग्रामीण पोलिसांना घरचा भेदी, लंका ढाल या म्हणीचा प्रत्यय आला अण् श्रीनिवास दाचावार यानेही आपणच टीप देवून ही घटना घडवली असल्याची पोलिसांना कबुली दिली. तद्नंतर याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार श्रीनिवास दाचावार याच्या सहकार्याने ग्रामीण पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून अवघ्या चार ते पाच तासात याप्रकरणातील तीन संशयित आरोपींच्या तत्काळ मुसक्या आवळल्या आहेत. एवढेच नाही तर, नांदेड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील मुळमुद्देमालासह मुख्य आरोपी श्रीनिवास दिलीपराव दाचावार व त्याच्या अन्य सहकारी आरोपींना ताब्यात घेतले असून यामध्ये दोन मोरे आणि एका गोगदरे नावाच्या आरोपींचा समावेश असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

महत्वपूर्ण बाब म्हणजे, या जबरी चोरी प्रकरणातील अन्य आरोपी तसेच उर्वरीत मुद्देमालही लवकरच पोलिसांच्या हाती लागेल, असा विश्वास पो.नि. अशोक घोरबांड व सपोनि. विश्वजित कासले यांनी dsf24news.प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केला आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील