मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रकृती बिघडल्याने आजपासून सुरू होणारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणीची तारीख येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यांनतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाने एकमेकांच्या आमदारांविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर आजपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुनावणी सुरू होणार होती. मात्र राहुल नार्वेकर यांची तब्येत बिघडल्याने आजची सुनावणी रद्द करण्यात आली. त्यांना सर्दीखोकल्याचा त्रास असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान राष्ट्रवादीच्या अपात्रता याचिकांवरील सुनाकणीचे कामकाज 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.