राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

जळगाव – भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसेयांच्यावर आता पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

राष्ट्रवादीकडूनखडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे

यासोबतच विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी वर्णी लागल्याची शक्यता वर्तवली जात होती. तसे पत्रही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना देण्यात आले होते. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल असे पक्षाचे राजकीय गणित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे आता ते सत्ताधाऱ्यांना कसे धारेवर धरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, भाजप नेते (BJP) गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने पुन्हा मोठी जबाबदारी दिली आहे. खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. खडसे यांच्या नियुक्ती करत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.