नशीराबाद पोलीस स्टेशन कडील महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात दिड महिन्यापासुन फरार असलेल्या आरोपीस सावदा पोलीसांनी केले जेरबंद

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – नशिराबाद पोलीस स्टेशन गुरंनं. 112/2024 भारतीय न्याय संहीता कलम 173 (2) वाढीव कलम 96 सह पोक्सो कायदा कलम 12 प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी मोहीत दिलीप कोळी रा.भादली बु. ता. जि. जळगांव हा मागील दिड महिन्यापासुन नशीराबाद पोलीसांना मिळत नव्हता. नशीराबाद पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री मनोरे यांनी सावदा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री.विशाल पाटील यांना माहीती देवुन सदरचा आरोपी हा सावदा पोलीस स्टेशनचे हद्दीत असलेबाबत कळविल्याने सपोनि श्री.विशाल पाटील यांनी सावदा पोलीस स्टेशन कडील पोलीस स्टाफ पोहेकाँ. 1424 विजय पोहेकर,पोहेका 1937 सिकंदर तडवी,पोकाँ. 1415 सुनिल कुरकुरे, पोकाँ. 2521 बबन तडवी, पोकाँ. 1390 विनोद दामोदर यांना वर नमूद आरोपीचा शोध घेणेकामी रवाना करुन सदर पोलीस पथकाने वरील आरोपीताबाबत गोपनीय माहिती काढून त्यास गाते ता. रावेर येथे त्याचे नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले त्याचे कडे चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने आरोपितास पुढील कारवाईकामी नशीराबाद पोलीस स्टेशन चे पोलीस उप निरीक्षक श्री. गणेश देशमुख व पथक यांचे ताब्यात दिले आहे.

ताजा खबरें