नाशिक : शिव महापुराण कथेला सहाव्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी

भक्ती आणि मुक्ती हे साधन आहे, निस्सीम भक्ती करून मिळालेली मुक्ती म्हणजेच मोक्षप्राप्ती असते, असे प्रतिपादन पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले.

शहरातील पोलिस कवायत मैदानावर आयोजित श्री शिव महापुराण कथा सोहळ्याच्या सहाव्या दिवशी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह प्रचंड जनसागर लोटला होता. महिलांची उपस्थिती नेहमीप्रमाणे लक्षणीय होती. पंडितजींनी त्यांच्या विशिष्ट शैलीत भगवान महादेवाच्या शक्तीवर प्रकाश टाकला.

उद्बोधन करताना पंडित मिश्रा म्हणाले, जगतगुरू शंकराचार्य हे भगवान शिवाचे अवतार होते, जन्ममृत्यूच्या चक्रातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल, तर शिवभक्तीशिवाय पर्याय नाही. महादेव माझा, मी महादेवाचा ही शून्यवस्था आहे. पैशाने सर्व कामे होतील, परंतु पैशाने मृत्यू टाळता येतं नाही, फक्त भगवान महादेवाच्या भक्तीनेच आपल्याला मृत्यूदेखील टाळता येतो. कारण ब्रह्म देवाचे वास्तव्य ब्रह्म लोकात, भगवान विष्णुचे वास्तव्य वैकुंठात पण भगवान शंकराचे वास्तव्य पृथ्वीवर म्हणजेच मृत्यूलोकात आहे. नातलग आणि देवदूत यात फरक आहे, नातलग आपल्या सुखात सोबत असतात, तर देवदूत आपल्याला दुःखाच्या वेळी साथ देतात, म्हणून ईश्वर भक्ती करा. इतरांविषयी नेहमीच चांगला विचार करा, भगवान शिव नक्कीच तुमचं कल्याण करेल. तुमच्याजवळ जे आहे, त्यात खुश रहायला शिका, असा उपदेश मिश्रा यांनी केला. रुद्राक्ष परिधान केल्याने इच्छाशक्ती प्रबळ होते, असे सांगताना पंडितजींनी पशुपती व्रताचे महत्व विशद केले.

बुधवारी,दि28 कथेच्या सहाव्या दिवशी भविकांची आजवरची सर्वाधिक गर्दी झाली होती. या मांदियाळीने संपूर्ण कॉलेज मैदान आणि कॉलेज रोड भाविकांनी व्यापले गेले गेले. मालेगावकरांनी केलेल्या यशस्वी आयोजनाचं आणि बाहेरगावच्या भाविकांना दिलेल्या निःस्वार्थ सेवेच पंडितजींनी कौतुक केलं.

jalgaonsandesh

jalgaonsandesh