नांद्रा बुद्रुक, ता.जळगाव येथे आज दि.29 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी -अकरा वाजता महिला ग्रामसभा बोलावण्यात आली होती. दुपारी -बारा वाजता सर्वसाधारण ग्रामसभा आयोजित केली होती. परंतु ग्रामसभेत सात ते आठ महिला उपस्थित असल्याने सभेचे गणपूर्ती न झाल्याने कोरम अभावी ग्रामसेवक -सुनील चौधरी यांनी महिला ग्रामसभा, व सर्वसाधारण सभा तहकुब केल्या. ग्रामसभेत वार्षिक सर्वसाधारण प्रशासन अहवाल चे वाचन करण्यात येणार होते. पुढील ग्रामसभेत वार्षिक प्रशासन अहवाल चे वाचन करण्यात येईल. अशी माहिती ग्रामसेवक सुनील चौधरी यांनी दिली.