सुनसगाव येथे नामसंकीर्तन सप्ताहास सुरूवात !

भुसावळ  – येथील श्री हनुमान मंदीर येथे सालाबादप्रमाणे श्री हनुमान जयंती निमित्त यंदाही ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात दररोज सकाळी काकडा आरती विष्णूसहस्रनाम आणि रात्री किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.यात ३० रोजी ह.भ.प. वासुदेव महाराज हरणखेड , ३१ रोजी ह.भ.प.रमेश महाराज सुनसगावकर ,१ रोजी महेश महाराज अडावद , २ रोजी हभप दिनकर महाराज जळगाव , ३ रोजी हभप श्रीराम महाराज उंटावद ,४ रोजी हभप दुर्गादास महाराज खिर्डी ,५ रोजी हभप धनु महाराज अंतुर्ली आणि ६ रोजी दिंडी सोहळा व रात्री हभप राजेंद्र महाराज केकत निंभोरेकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे . यावेळी मृदंगमणी हभप मुरलीधर बेंडाळे व गायक राजू महाराज हरणखेड , कैलास महाराज पिंप्री तर विणेकरी सुधाकर माळी नशिराबाद व रविंद्र नारखेडे हे राहणार असून भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh