मुस्लिमाची संख्या २२ कोटींवर… एखाद-दोन कोटी मेले तरी हरकत नाही! बघा व्हिडीओ

भोपाळ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरेशी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. वादग्रस्त विधानांचा वर्षाव करणारे कुरेशी यांनी काँग्रेसने आपल्याला पक्षामधून काढायचेच असेल तर काढून टाकावे, असे म्हणत मुसलमानांवर वादग्रस्त वक्तव्य केले.

”22 कोटी मुस्लिमांनी बांगड्या घातलेल्या नाहीत, त्यापैकी 1-2 कोटी मेले तरी फरक पडत नाही,” असे म्हणून कुरेशी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील लाटेरी येथे आयोजित कार्यक्रमात कुरेशी यांनी एकापाठोपाठ एक अनेक वादग्रस्त विधाने केली आणि काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर कठोर टीका करीत घरचा आहेर केला. Muslim-killings-Congress ते स्वतःच्याच पक्षाविरुद्ध उफाळून बोलले आणि त्यांनी काँग्रेस हिंदुत्वाचा अजेंडा चालवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, काँग्रेस कार्यालयात मूर्ती बसवणे आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारणे म्हणजे बुडून मरण्यासारखी बाब असल्याचे म्हटले आहे. Muslim-killings-Congress गंगा मैया की जय या घोषणेलाही त्यांनी आक्षेप घेतला.

कुरेशी म्हणाले, ‘आज काँग्रेसचे काही लोक हिंदुत्व, यात्रा, जय गंगा मैया, जय नर्मदा मैय्या यावर बोलतात. ही लज्जास्पद बाब आहे. मला भीती नाही, वाटल्यास मला पक्षातून काढून टाका. Muslim-killings-Congress नेहरूंचे कार्यकर्ते, आमचे काँग्रेसचे लोक आज धार्मिक यात्रा काढतात. अभिमानाने सांगा म्हणतात की मी हिंदू आहे. काँग्रेस कार्यालयात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ही बुडून मरण्याची बाब आहे.’

कुरेशी म्हणाले की, मुस्लिम हे कोणत्याही पक्षाचे गुलाम नाहीत. काँग्रेसचेही नाव घेत उत्तर प्रदेशच्या माजी राज्यपालांनी विचारले की, ‘मुस्लिमांनी तुम्हाला मत का द्यावे? तुम्ही नोकऱ्या देत नाही? त्यांना पोलीस, लष्कर, नौदलात का घेत नाही? मग मुस्लिमांनी तुम्हाला मतदान तरी का करावे? Muslim-killings-Congress चिथावणीखोर वक्तव्यात कुरेशी म्हणाले की, देशात 22 कोटी मुस्लिम आहेत आणि 1-2 कोटी मेले तरी हरकत नाही. ते म्हणाले, ‘आम्ही एका मर्यादेपर्यंत सहन करू. पण, जेव्हा पाणी डोक्यावरून जाईल तेव्हा मुस्लिमही मागे हटणार नाहीत. त्यांनी काही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत,’ असे वक्तव्य केले आहे.

 

ताजा खबरें