MP Election Result: राजस्थानप्रमाणेच सुरुवातीचे कल भाजपाकडे झुकणारे; जादुई आकडा कोण गाठणार?

भोपाल – देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या निवडणूक निकालाला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजतापासून सुरू झालेल्या मतमोजणीपासून साडेनऊ वाजेपर्यंत आलेल्या सुरुवातीचे कल हे भाजपकडे झुकणारे असून, तेव्हा कोणता पक्ष मध्य प्रदेशमध्ये 116 चा जादुई आकडा गाठतो हे पहावे लागणार आहे.

सकाळी 9.30 वाजेपर्यंत 230 विधानसभा जागापैकी 205 जागांचे कल हाती आली असून, त्यापैकी 113 जागांपैकी 113 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसून आले तर 90 जागांवर कॉंग्रेस असल्याचे सुरुवातीच्या पहिल्या कलामध्ये दिसून आले.

अशातच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले की, आलेल्या सुरुवातीच्या कलानुसार आम्ही पूर्ण बहुमताने जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूणच त्यांनी विजयाचा दावा केला आहे. ते म्हणाले की, गतवेळेप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या पक्षांतराची भीती नाही. पोस्टल बॅलेटबाबत काही शंका असल्यास कारवाई केली जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

भाजपकडून कोण मागे ? कोण पुढे?

आतापर्यंत आलेल्या सुरुवातीच्या कलापैकी आतापर्यंत भाजपकडून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बुधनी (सेहोर), केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर दिमनी (मोरेना), कैलाश विजयवर्गीय इंदूर-1 मधून पुढे आहेत. तर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा दतियामधून, मंत्री मोहन यादव दक्षिण उज्जैनमधून पिछाडीवर आहेत. सांची येथील मंत्री प्रभुराम चौधरी मागे आहेत. निवास (मंडला) येथून केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते, सुवासरा (मंदसौर) मधून मंत्री हरदीप सिंग डांग, नरेला (भोपाळ) मधून मंत्री विश्वास सारंग पुढे आहेत. गदरवाडा (नरसिंगपूर) येथून खासदार उदय प्रताप सिंह, मल्हारगड (मंदसौर) येथून मंत्री जगदीश देवरा, नरसिंगपूरमधून प्रल्हाद पटेल पुढे आहेत. मंत्री ब्रिजेंद्र सिंह यादव मुंगवली (अशोकनगर) येथून पुढे आहेत. दमोहमधून जयंत मलाय्या पुढे असल्याचे दिसून येत आहेत.

काँग्रेसमध्ये कोण पुढे? कोण मागे?

कॉंग्रेसकडून छिंदवाडा येथून कमलनाथ पुढे आहेत तर लहार (भिंड) येथून विरोधी पक्षनेते गोविंद सिंग मागे आहेत. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे अजय सिंह आघाडीवर आहेत. राऊळ (इंदूर) येथील जितू पटवारी, गोटेगाव (नरसिंगपूर) येथील माजी सभापती एन.पी.प्रजापती मागे आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh