मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. या बाबत पोहेकाॅ ईश्वर पाटील यांनी तांत्रिक विश्लेषण करून अनिल काशिनाथ सोनवणे रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव ह मु सावखेडा ता. जळगाव याचे नाव निष्पन्न केले. त्यावर बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हा शाखा जळगाव यांनी सपोनि विशाल पाटील, पोहेकाॅ संदिप पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, पोहेकाॅ प्रविण मांडोळे, ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी यांचे पथक तयार करून अनिल काशिनाथ सोनवणे यास अटक करण्याचे आदेश दिले त्यानुसार या पथकाने शिताफीने सावखेडा ता जळगाव येथील भिलाटी परीसरातून अनिल सोनवणे यास अटक केली. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र अंगझडती घेतली असता धरणगाव पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुरनं ४४० / २०२३ भादवि कलम ३९२ च्या पुढील कारवाई साठी धरणगाव पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.

सदर गुन्ह्याची कारवाई डॉ महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव, श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.