आमदार संतोष बांगर पुन्हा वादात, कामचोरपणाची ‘ती’ ऑडियो क्लिप व्हायरल

हिंगोली – शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण अनेक वेळा घडून आले आहे. आमदार संतोष बांगर यांनी काही महिन्यांपूर्वी एका खानावळी चालकाला शिविगाळ केली होती.

तसेच त्याच्या कानशिलात लगावली होती. हा वाद चांगलाच रंगला होता. त्यानंतर कृषी अधिकाऱ्याशी झालेला वाद चर्चेत आला होता. हॉस्पिटलच्या बिलावरून एका डॉक्टरला धमकी दिल्याचा ऑडिओ मध्यतंरी व्हायरल झाला होता. आता एक नवीन ऑडिओमुळे आमदार संतोष बांगर चर्चेत आले आहे. हा ऑडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ पाटील यांनी एक्सवर टाकला आहे.

काय आहे ऑडिओ

हिंगोली आमदार संतोष बांगर आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांमधील संवाद अयोध्या पौळ पाटील यांनी व्हायरल केला आहे. काय रे सर्वजण माझ्या लाडक्या #गद्दार दादुड्याचा आवाज विसरले का? तर मग ऐका…..कामचोरपणा कसा करावा हे शिकवणारे गद्दार लोकप्रतिनिधी व लाईनमन यांचे संभाषण…. असे लिहित अयोध्या पौळ यांनी हा संवाद ट्विट केला आहे. संवादात आमदार संतोष बंगार यांनी यापुढे तू गावकऱ्यांना सांगून दे, माझ्याने काम होत नाही, मी तुमचे गाव सोडत आहे, असे म्हणताना दिसत आहे.

काय झाला संवाद

लाईनमन बोलत आहे. चव्हाण साहेबांचा फोन आला होता. तुम्ही सांगितल्यामुळे ते गाव घेतले आहे. मोठी कामे तुमच्यापर्यंत आली तर आम्ही हक्काने करतो. पण किरकोळ कामे तुमच्याकडे येत आहे. फ्यूज गेला, यासाठी हिवऱ्यासारखे गावातील लोक, डांगे कंपनी तुम्हाला फोन करत असतील कसे करावे. या गोष्टींमुळे मी ते गाव घेत नव्हतो. आता सीझन सुरु झाल्यावर जास्तच त्रास होत आहे. त्यावर आमदार बांगर म्हणतात की, आता तू जा आणि त्यांना सांग, मी हे काम करतो. पण माझ्याने यापुढे ही कामे होणार नाही. मी तुमचे गाव सोडून देत आहे. एकादा तू असे गावकऱ्यांना बोलून ये, असा सल्ला आमदार देत असल्याचे ऑ़डिओतून दिसून येत आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh