ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यासाठी उपोषण…

चोपडा: महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना चोपडा शाखेतर्फे चोपडा तालुका ग्रामरोजगार सेवकांनी दिनांक : ०२/१०/२०२ रोजी तहसिल / पंचायत समिती कार्यालयाजवळ विविध मागण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहेया उपोषणात ग्राम पंचायत कर्मचारी सेवेत रोजगार सेवकांना कायम करणे. व प्रवास भत्ते, अल्पोहार भत्ते, स्टेशनरी खर्च सन २०१३ पासुन थकीत असुन त्वरीत मिळावा.आणि वैयक्तीक खातेमध्ये मानधन मिळणेआदि मागण्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवकांची संख्या २८००० एवढी असुन महाराष्ट्र सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजने अतंर्गत ग्रामसभेतून रोजगार सेवकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले त्यानुसार २००६ पासुन ते आजतागायत २८००० रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या निधीतून फक्त ६% मानधनावर काम करीत आहेत. प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायत निवडणूका झाल्यास नवीन सदस्य सरपंच यांची निवड होते. सत्तातंर झाल्यावर सुडबुध्दीने रोजगार सेवकांवर खोटया तक्रारी, त्रास देणे व कामा वरुन कमी करणे असा अन्याय होतो. या त्रासापासून सुटका करण्याकरिता ग्रामपंचायत कर्मचारी म्हणुन कायम करण्यात यावे.तसेच सन २०१३ पासुन आज पर्यंत रोजगार सेवकांना प्रवासभत्ते, अल्प आहार भत्ते व स्टेशनरी असे विषय स्पष्ट करण्यात आले आहेत.
निवेदनावर गोपाळ बनकर, प्रेमनाथ कोळी, अशोक पाटील, गौतम भालेराव, कृष्णा देवराज, भगवान कोळी, जयराम ठाकरे, विलास बाविस्कर, निलेश पविले, निलेश पाटील, युवराज जमादार, राधेश्याम पाटील, गजानन पाटील, संजय विसावे, पंकज कोळी, कल्याण पाटील, दिनेश बालेला, नामदेव बाविस्कर, राहुल अहिरे,अनिल पावरा,निंबा पाटील, नितीन कोळी, संजय पाटील, घनश्याम बाविस्क इत्यादी उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh